ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
गोवा राज्य दिवस दरवर्षी 30 मे रोजी साजरा केला जातो.
या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये गोव्याचा ३७ वा राज्य दिवस आहे.
गोवा १९ डिसेंबर १९६१ रोजी स्वतंत्र झाला, पण ३० मे १९८७ रोजी गोव्याला संपूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला होते
गोवा विविध संस्कृती, संगीत, नृत्य, पारंपारिक पाककृती आणि कला प्रकारांसाठी प्रसिद्ध आहे.
गोव्यामधील निसर्गरम्य समुद्र आणि संस्कृतीमुळे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ मानले जाते.
गोव्यावर पोर्तुगीज राजवट लागू होती. पोर्तुगीज राजवट हटवण्यासाठी अनेक लोकांनी त्यांच्या जीवाची बाजी लावली होती.
गोव्यामध्ये 30 मे हा दिवस राज्यास्वातंत्र करण्यासाठी ज्या लोकांनी जीवाची आहूती दिली त्या लोकांचं स्मरण करण्यासाठी थाटामाटात साजरा केला जातो.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.