Gmail Safety: हॅकर्सपासून तुमचे Gmail वाचवायचे का? वापरा 'हे' सोपे ट्रिक्स

Dhanshri Shintre

Gmail

गोपनीयतेची काळजी न घेतल्यास हॅकर्स तुमचे Gmail खाते सहजपणे हॅक करू शकतात; खात्रीसाठी टू-स्टेप ऑथेंटिकेशन, मजबूत पासवर्ड वापरा, अँप परवानग्या तपासा, फिशिंग लिंक टाळा.

बँकिंग माहितीशीही जोडलेले

जीमेल केवळ ईमेलसाठी नाही, तर ते Google Drive, YouTube, Photos तसेच तुमच्या बँकिंग माहितीशीही जोडलेले असल्याने त्याची सुरक्षा अधिक महत्त्वाची ठरते.

पासवर्ड मजबूत ठेवा

तुमच्या Gmail खात्याचा पासवर्ड मजबूत ठेवा, मोठे व लहान अक्षर, संख्या व विशेष चिन्ह समाविष्ट करा आणि नियमितपणे बदल करत रहा; कधीही शेअर करू नका.

टू-स्टेप ऑथेंटिकेशन

टू-स्टेप ऑथेंटिकेशन सक्रिय करा, ज्यामुळे पासवर्ड माहित असला तरी हॅकर्स तुमचे Gmail खाते उघडू शकणार नाहीत; यामुळे खात्याची सुरक्षा आणखी मजबूत होते.

अटॅचमेंट

अनोळखी ईमेलमधील अटॅचमेंटवर क्लिक करण्याचे टाळा, कारण अशा लिंकवर क्लिक केल्यास हॅकर्सना तुमच्या Gmail खात्याचा प्रवेश मिळू शकतो आणि गोपनीयता धोक्यात येते.

कुठे लॉगिन झाले तपासणे

myaccount.google.com ला भेट द्या, जिथे तुम्ही तुमचे Gmail खाते कोणत्या डिव्हाइस किंवा ठिकाणाहून लॉग इन झाले आहे ते सहज तपासू शकता.

नियमित पासवर्ड बदला

जीमेल सुरक्षित ठेवण्यासाठी नियमितपणे पासवर्ड बदला, टू-स्टेप ऑथेंटिकेशन चालू करा, अज्ञात अटॅचमेंट टाळा, लॉगिन क्रियाकलाप व अँप परवानग्या तसेच तपासा.

NEXT: मोबाईलप्रेमींसाठी खास ऑफर! आयफोन १५ वर मिळत आहे २०,००० रुपयांची सूट, लगेच ऑर्डर करा

येथे क्लिक करा