Manasvi Choudhary
चेहऱ्यावर नैसर्गिकरित्या ग्लो येण्यासाठी महिला व मुली बरीच मेहनत घेतात. अनेक उपाय करतात.
आजकाल कामाचा ताण, प्रदूषण, धूळ, खाण्यापिण्याच्या सवयींचा परिणाम चेहऱ्यावर दिसतो. चेहऱ्यावरी सौंदर्य कमी होते.
त्वचेचं सौंदर्य कायम राहण्यासाठी तुम्ही घरीच काही सोपे उपाय करू शकता.
चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी तुम्ही हे घरगुती ड्रिंक पिऊ शकता यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक राहील.
डिटॉक्स ड्रिंक बनवण्यासाठी ओवा, जिरा, बडीशेप, दालचिनी, लवंग, वेलची हे साहित्य एकत्र करा.
सर्वातआधी एका भांड्यात ओवा, जिरा, बडीशेप, दालचिनी, लवंग आणि वेलची हे रात्रभर पाण्यात भिजत घाला.
सकाळी उठल्यानंतर हे तुम्ही ५ ते १० मिनिटे उकळून घ्या. नंतर हे पाणी थंड करा.
थंड पाणी गाळून एका ग्लासमध्ये घ्या आणि सकाळी रिकाम्यापोटी सर्व्ह करा. तुम्हाला आठवडाभरातच फरक दिसून येईल.