Manasvi Choudhary
'सकाळ प्रस्तुत सुहाना स्वास्थ्यम्' आरोग्य महोत्सव नुकताच मोठ्या मंगलमय वातावरणात पार पडला.
या आरोग्य महोत्सवात पतंजली आयुर्वेद चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी निरोगी राहण्याचा मोलाचा सल्ला दिला आहे.
निरोगी जीवनासाठी आहार, दिनचर्या, ऋतूचर्या आणि योगसाधनेला विशेष महत्व असल्याचे त्यांनी सांगितले.
आचार्य बालकृष्ण यांनी दैनंदिन जीवनशैली कशी असावी? याविषयी म्हटलं आहे.
दररोज सूर्योदयापूर्वी झोपेतून उठा
ब्रश करून सुमारे २५० ते ५०० मिलिलीटर पाणी प्या
शरीराला सृदृढ ठेवण्यासाठी व्यायाम करा
जेवणानंतर एकदम पाणी पिऊ नका
रात्रीचे जेवण वेळेवर करा
लोणचे, दही, आइस्क्रीम रात्री हे पदार्थ खाऊ नयेत.