Surabhi Jayashree Jagdish
रात्रीच्या शिल्लक चपाती खायला अनेकांना कंटाळा येतो. मात्र दुसऱ्या दिवशी तुम्ही त्या चपात्यांचे टेस्टी पदार्थ बनवू शकता.
रात्रीच्या शिळ्या चपात्यांपासून तुम्ही टेस्टी आणि हेल्दी पदार्थ बनवू शकता. मुख्य म्हणजे हे पदार्थ तुमच्या मुलांना नक्की आवडतील.
शिळ्या चपाती कापून अंड्याच्या मिश्रणात घाला आणि तव्यावर परता. कांदा-मिरची आणि मसाले मिसळा. यामध्ये गोड-तिखट प्रमाणानुसार घाला. हा एक प्रोटीनयुक्त आणि झटपट सकाळचा नाश्ता आहे.
चपातींचे तुकडे करून त्यात गूळ किंवा साखर, तूप आणि कापलेला सुकामेवा मिसळा. चांगले मिसळून सलोईसारखे लाडू तयार आणि सर्व्ह करा.
शिळ्या चपातींचे छोटे तुकडे कापा. यामध्ये भेंडी, गाजर, फुलकोबी सारख्या भाज्यांसह तव्यावर परता. थोडं सोया सॉस, मीठ आणि मिरपूड घालून एक देसी-नूडल्स बनवा. हा हलका पण पौष्टिक आणि झटपट नाश्ता आहे.
कांदा मिसळून चण्याचं पीठ तयार कसा. यावेळी बटाटा आणि चपाती चिरून पकोडे बनवा. हे पकोडे मध्यम आचेवर तळा आणि चटणीसोबत सर्व्ह करा. हा चहासाठी अफलातून पकोडा आहे.
शिळ्या चपातीवर टोमॅटो सॉस लावा, भाज्या आणि चीज टाका. तव्यावर किंवा ओव्हनमध्ये थोडं भाजा. चपाती फ्युझन-पिझ्झा म्हणून मुलांना हा आवडणारा पदार्थ आहे.