Cardiac Arrest First Aid: घरात कुणी अचानक बेशुद्ध पडलं तर काय कराल? पहिल्या ५ मिनिटांत करा हे ७ उपाय

Shruti Vilas Kadam

व्यक्ती प्रतिसाद देते का ते तपासा

व्यक्ती कोसळल्यानंतर सर्वप्रथम आजूबाजूची जागा सुरक्षित आहे का ते पाहा. त्यानंतर व्यक्तीच्या खांद्याला हलकेच स्पर्श करून मोठ्याने हाका मारा. व्यक्ती प्रतिसाद देत नसेल, तर तातडीने वैद्यकिय मदत घ्या

Cardiac Arrest | Google

त्वरित रुग्णवाहिका बोलवा

व्यक्ती बेशुद्ध असून श्वास घेत नसेल किंवा फक्त अधूनमधून धाप घेत असेल, तर तातडीने आपत्कालीन मदत बोलवा. भारतात ११२ किंवा १०८ या क्रमांकांवर संपर्क साधता येतो.

Cardiac Arrest | Google

श्वासोच्छ्वास तपासा

व्यक्ती श्वास घेत आहे का? हे तपासा. व्यक्ती प्रतिसाद देत नसेल तर कार्डियाक अरेस्टची शक्यता लक्षात घेऊन तातडीने CPR सुरू करणे आवश्यक आहे.

CPR

गरज असल्यास CPR सुरू करा

प्रौढ व्यक्ती बेशुद्ध असून श्वास घेत नसेल, तर आपत्कालीन सेवेला फोन केल्यानंतर छातीवर दाब देण्यास सुरुवात करा. छातीच्या मध्यभागी दोन्ही हात ठेवून दर मिनिटाला १०० ते १२० वेळा दाब द्या. प्रत्येक दाबानंतर छाती पुन्हा पूर्वस्थितीत येऊ द्या.

CPR

AED मशीन उपलब्ध असल्यास वापरा

ऑटोमेटेड एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर (AED) मशीन उपलब्ध असल्यास ते सुरू करा आणि त्यातील आवाजाद्वारे दिलेल्या सूचनांचे पालन करा.

CPR

व्यक्तीला पाणी किंवा औषधे देऊ नका

बेशुद्ध व्यक्तीला पाणी, अन्न किंवा तोंडावाटे औषधे देऊ नका. तसेच जबरदस्तीने उठवू नका किंवा चालवू नका. यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होऊ शकते.

CPR During Heart Attack

छातीत दुखत असल्यास तातडीने मदत घ्या

व्यक्ती शुद्धीत असला तरी छातीत दुखणे, घाम येणे किंवा धाप लागणे ही हृदयविकाराच्या झटक्याची लक्षणे असू शकतात. त्वरित रुग्णवाहिका बोलवा अशावेळी चालणे किंवा जिने उतरणे टाळा.

CPR

Skin Care: चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर फोडावेत की नाही? जाणून घ्या त्वचारोगतज्ज्ञांचा हा खास सल्ला

Skin Care | Saam Tv
येथे क्लिक करा