Girls Care Tips: प्रत्येक मुलीला माहित असल्या पाहिजेत या ७ हाइजीन टिप्स

Shruti Vilas Kadam

व्हजाइनल एक्सरसाइज नियमित करा

केगल व्यायामामुळे पेल्विक स्नायू मजबूत होतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारते आणि प्राइवेट भागाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

Girls Care Tips

ओले कपडे लगेच बदला

स्विमिंग किंवा व्यायामानंतर ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवू नयेत. ओलसरपणामुळे बुरशी व इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.

Girls Care Tips

स्वच्छतेची योग्य पद्धत वापरा

टॉयलेट वापरल्यानंतर नेहमी पुढून मागे (आगेपासून मागे) या दिशेने साफ करावे. त्यामुळे हानिकारक बॅक्टेरिया वेजायना पर्यंत पोहोचत नाहीत.

Girls Care Tips

योग्य अंडरवियरची निवड करा

कॉटनचे अंडरवेअर वापरल्यास हवा खेळती राहते आणि पसीना शोषला जातो. सिंथेटिक अंडरवियरमुळे इन्फेक्शनची शक्यता वाढू शकते.

Girls Care Tips

व्हजायना आतून धुवू नका

व्हजायना नैसर्गिकरित्या स्वतः स्वच्छ राहते. आतून वारंवार धुतल्यास नैसर्गिक pH संतुलन बिघडू शकते आणि चांगले बॅक्टेरिया नष्ट होऊ शकतात.

Girls Care Tips

सुगंधीत उत्पादने टाळा

सुगंध असलेले साबण, स्प्रे किंवा वॉश वापरल्याने pH बॅलन्स बिघडू शकतो व जळजळ होऊ शकते. त्यामुळे नेहमी बिना सुगंधाची उत्पादने वापरणे योग्य ठरते.

Girls Care Tips

पॅड किंवा टँपॉन वेळेवर बदला

सेनेटरी पॅड किंवा टँपॉन जास्त वेळ वापरल्यास बॅक्टेरिया वाढतात आणि संसर्गाचा धोका निर्माण होतो. त्यामुळे ठराविक वेळेत ते बदलणे अत्यंत गरजेचे आहे.

Girls Care Tips

Tikhata Purya Recipe: सणासुदीला यावेळी गोड पुऱ्यांऐवजी बनवा टेस्टी चटपटीत तिखट पुऱ्या, वाचा सोपी रेसिपी

Tikhata Purya Recipe
येथे क्लिक करा