Ruchika Jadhav
अभिनेत्री गिरीजाने पुन्हा एकदा मराठमोळ्या साज मधील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
यावेळी तिने साज श्रृंगारासाठी जांभळ्या रंगाच्या साडीची निवड केली आहे.
केसांच्या हेअर स्टाइलमध्ये अभिनेत्रीने केसांचा सुंदर असा खोपा बांधला आहे.
हा साज पूर्ण करण्यासाठी अभिनेत्रीने कानात हेवी इअररींग्स सुद्धा परिधान केले आहेत.
गिरीजा महाराष्ट्रीयन लूकमध्ये नेहमी चंद्रकोर कपाळी लावत असते.
चंद्रकोर आणि नाकात नथ असल्याने तिचं रुप आणखी जास्त खुलून दिसतं.