Siddhi Hande
गिरिजा ओक गोडबोले इंटरनेटवर नॅशनल क्रश म्हणून ओळखली जात आहे. ती सोशल मीडियावर सेन्सेशन बनली आहे.
गिरिजा ओकने फक्त मराठी, हिंदी नव्हे तर कन्नड चित्रपटांमध्येही काम केले आहे.
गिरिजा ही ज्येष्ठ अभिनेते गिरिश ओक यांची कन्या आहे.
गिरिजाने मुंबईच्या ठाकूर कॉलेजमधून बायोटेक्नोलॉजिकल पदवी प्राप्त केली आहे.
गिरिजाने अभिनयापूर्वी जाहिराती आणि थिएटर वर्कशॉपमध्ये भाग घेतला होता. त्यामुळेच तिच्या करिअरला कलाटणी मिळाली.
गिरिजाने आमिर खानच्या तारे जमीन पर चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तो तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला.
गिरिजाने २०१० मध्ये लज्जा मालिकेत काम केले होते. या मालिकेमुळे तिला सर्वाधिक लोकप्रियता मिळाली.
गिरिजा उत्तम गायिकादेखील आहे. तिने सिंगिंग स्टार या स्पर्धेतदेखील भाग घेतला होता.
गिरिजाने लोकप्रिय सीआयडी मालिकेतदेखील काम केले होते.याचसोबत लेडीज स्पेशल सिझन २ मध्येही ती दिसली होती.
गिरिजाने दिग्दर्शक सुहृद गोडबोले यांच्याशी लग्न केले आहे.
गिरिजाला कबीर नावाचा १३ वर्षांचा मुलगा आहे. ती कुटुंबासोबत आपले कामदेखील उत्तम पद्धतीने सांभाळते.