Siddhi Hande
मराठी चित्रपट आणि मालिकांमधून घराघरात पोहचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गिरिजा ओक.
गिरिजा ओकने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले नावलौकिक कमावले आहे. तिने अनेक हिंदी, चित्रपट आणि वेबसीरीजमध्ये काम केले आहे.
गिरिजा सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमी सक्रिय असते. ती लवकरच थेरपी शेरेपी वेबसीरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
गिरिजा नेहमीच सोशल मीडियावर मराठमोळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
गिरिजाला साडी नेसायला खूप आवडते. ती नेहमी कॉटनच्या सिंपल साड्यांवर फोटोशूट करत असते.
गिरिजा ही खूप सुंदर, देखणी आणि उत्तम अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
गिरिजाने शाहरुख खानसोबत जवान या चित्रपटात काम केले आहे. तिचे या चित्रपटासाठी विशेष कौतुक करण्यात आले होते.