Manasvi Choudhary
आयुर्वेदात आलं औषधी गुणधर्मासाठी ओळखले जाते. अनेक घरगुती उपायांवर आल्याचा वापर केला जातो.
सलग ११ दिवस कच्चे आलं खाल्ल्यास शरीरात अनेक सकारात्मक बदल होतात, ते बदल कोणते? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
आलं शरीरातील पाचक रस सक्रिय करण्यास मदत करते ज्यामुळे पोट फुगणे, गॅस, अपचन किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या दूर होतात.
अनेक लोकांना सकाळी उठल्यावर मळमळणे किंवा चक्कर येण्याचा त्रास होतो. अशा वेळी आल्याचा तुकडा किंवा आल्याचे पाणी सेवन केल्यास हा त्रास दूर होतो.
आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे सांधेदुखी, हाडांचे दुखणे आणि संधीवाताचा त्रास असलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत गुणकारी ठरते.
आल्यामधील अँटीऑक्सिडंट्स गुणधर्म शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधरवतात. ज्यामुळे संसर्गजन्य आजार आणि व्हायरल इन्फेक्शनपासून लढण्यास मदत होते.
नियमितपणे आल्याचे सेवन केल्यास शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.
अनेक महिलांना मासिक पाळी दरम्यान तीव्र पोटदुखी आणि कंबरदुखीचा त्रास होतो. या दिवसांमध्ये आल्याचा काढा किंवा चहा घेतल्यास आराम मिळतो.
आल्याचं पाणी प्यायल्याने चरबी वेगाने पचण्यास मदत होते. तसेच भूक नियंत्रणात राहून वजन घटते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.