Shreya Maskar
जिंजीचा किल्ला सेनजी किल्ला म्हणूनही ओळखला जातो. हा भारतातील तमिळनाडू राज्यातील विल्लुपुरम जिल्ह्यात आहे. जिंजी किल्ला तीन एकमेकांशी जोडलेल्या उंच टेकड्यांवर बसले आहे. (राजागिरी, कृष्णगिरी , चंद्रदुर्ग)
राजागिरी किल्ला हा उंच टेकडीवर वसलेला आहे. यात ७ मजली कल्याण महाल, धान्य कोठारे, टेहळणी बुरूज आणि नैसर्गिक दरीवर असलेला लाकडी उचल-पूल यांचा समावेश आहे.
कृष्णगिरी किल्ला हा राणीचा गड म्हणून ओळखला जातो. जिंजीच्या किल्ल्याचा कृष्णगिरी हा एक प्रमुख जोड किल्ला आहे.येथे दगडी मंडप, प्राचीन मंदिरे आणि आसपासच्या मैदानी प्रदेशाचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
चंद्रदुर्ग किल्ल्याला चंद्रयान दुर्ग असेही म्हणतात. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या मोहिमेत आणि मराठ्यांच्या इतिहासात अत्यंत सामरिक महत्त्वाचा राहिला आहे.
जिंजीजवळील टेकडीच्या उतारावर खडकात कोरलेले विष्णूचे प्राचीन मंदिर आहे. यात भगवान रंगनाथांची झोपलेल्या अवस्थेतील (शयनमुद्रेतील) भव्य मूर्ती आहे.
तामिळनाडूमध्ये भगवान विष्णूचे (व्यंकटेश्वर) रूप असलेल्या व्यंकटरमण स्वामी किंवा कल्याण व्यंकटरमण स्वामी नावाची अनेक प्रसिद्ध आणि प्राचीन मंदिरे आहेत. यामध्ये जिंजी येथील ऐतिहासिक जिंजी वेंकटरमण मंदिर आहे.
पनामलाई ताल गिरीश्वरर मंदिर ( थलगिरीश्वरर मंदिर ) हे तामिळनाडू राज्यातील विल्लुपुरम जिल्ह्यातील पनामलाई गावातील एका टेकडीवर वसलेले १,३०० वर्षे जुने ऐतिहासिक शिवमंदिर आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.
जिंजीचा किल्ला सेनजी किल्ला म्हणूनही ओळखला जातो. हा भारतातील तमिळनाडू राज्यातील विल्लुपुरम जिल्ह्यात आहे. जिंजी किल्ला तीन एकमेकांशी जोडलेल्या उंच टेकड्यांवर बसले आहे. (राजागिरी, कृष्णगिरी , चंद्रदुर्ग)