Shreya Maskar
पावसाळ्यात तुम्ही जर तुम्हाला मुंबईतच कुठे तरी नवीन ठिकाणी फिरायला जायचे असेल तर 'गिल्बर्ट हिल' हे ठिकाण बेस्ट राहिल.
'गिल्बर्ट हिल' हा मुंबईतील अंधेरी येथील २०० फूट (६१ मीटर) उंच, काळ्या बेसाल्ट खडकाचा एकसंध (मोनोलिथिक) डोंगर आहे. एकदा तरी हे ठिकाण पाहायला नक्की जा.
'गिल्बर्ट हिल' ६ कोटी ६० लाख वर्षांपूर्वीच्या 'मेसोजोइक' युगातील आहे. येथील मुख्य आकर्षणांमध्ये शिखरावर असलेली गावदेवी आणि दुर्गमाता मंदिरे, तसेच शहराच्या क्षितिजाचे विहंगम दृश्य यांचा समावेश होतो.
जगभरातील अशा प्रकारच्या केवळ तीन दुर्मिळ स्तंभाकार ज्वालामुखी रचनांपैकी हा एक आहे; इतर दोन रचना म्हणजे वायोमिंगमधील 'डेव्हिल्स टॉवर' आणि कॅलिफोर्नियातील 'डेव्हिल्स पोस्टपाइल' या होत.
'गिल्बर्ट हिल' पाहायला जायचे असल्यास अंधेरी रेल्वे स्टेशन आणि आझाद नगर मेट्रो स्टेशन जवळ आहे. स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने पुढे जाऊ शकता.
गिल्बर्ट हिल हा ज्वालामुखी खडक आहे. तुम्ही येथे छोटा ट्रेक प्लान करू शकता. येथून शहराचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
महाकाली लेणी, जुहू बीच, छोटा काश्मीर तसेच अनेक लहान मोठी उद्याने आणि तलाव देखील येथे आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.