Manasvi Choudhary
घुंगरू डिझाईन्स साड्यांचा सध्या जबरदस्त ट्रेंड सुरू आहे. साडीच्या काठावर किंवा पदरावर लावलेले छोटे-छोटे घुंगरू या साड्यांचे मुख्य आकर्षण ठरत आहेत.
घुंगरूच्या साड्यांचे लेटेस्ट ५ पॅटर्न्स आणि डिझाईन्स पाहूया.
घुंगरू टिशू सिल्क साड्या वजनाला अतिशय हलक्या असतात. या साडीवर बारीक बुट्टी किंवा छोटे घुंगरू असतात आणि कडेला नाजूक जरी किंवा लेस बॉर्डर असते, ज्यामुळे या साड्या खूप उठून दिसतात.
जॉर्जेट घुंगरू साड्या प्रचंड ट्रेंडमध्ये आहेत. या साड्या कम्फर्टेबल आणि उठून दिसतात.या साड्यांमध्ये वाईन, मरून, गडद जांभळा तसेच बेबी पिंक अशा लाईट आणि डार्क दोन्ही शेड्समध्ये या साड्या उपलब्ध आहेत.
जर तुम्हाला लग्नसमारंभ किंवा पूजेसाठी अस्सल पारंपारिक लूक हवा असेल, तर बनारसी बॉर्डर घुंगरू साडी बेस्ट आहे.
ऑर्गेंन्झा साड्यांमध्ये फ्लोरल प्रिंट्स किंवा प्लेन पेस्टल शेड्सवर घुंगरूं असतात. ही साडी अतिशय नाजूक आणि सुंदर दिसते.
कॉकटेल पार्टी, संगीत किंवा खास रिसेप्शनसाठी फॅशनेबल आणि मॉडर्न स्टाईल हवी असल्यास मिरर वर्क घुंगरू साडी निवडा.