Shruti Vilas Kadam
एका ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या. त्यात एक चमचा शुद्ध तूप घाला. चमच्याने चांगले मिसळा आणि हे मिश्रण सकाळी प्या. पाणी खूप गरम नसावे.
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीराला द्रवपदार्थ मिळतात. तुपामध्ये असणारे फॅट्स शरिराला उर्जा देण्याचे काम करतात.
काही लोकांना तूप सेवन केल्याने मल मऊ होण्यास मदत होऊ शकते. यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत होते.
तुपामध्ये फॅट्सचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ते शरीराला एनर्जी देण्याचे काम करते. सकाळच्या आहारात मर्यादित प्रमाणात तुपाचा समावेश करता येतो.
तुपामध्ये फॅट्ससोबत काही प्रमाणात फॅट-सोल्युबल व्हिटॅमिन्स असतात. यामुळे शरीराला आवश्यक ते हेल्दी फॅट्स मिळतात.
तुपातील फॅट्स शरीराला उर्जा आणि पोषण देतात. यामुळे पोट साफ होण्यास मदत होते आणि चेहऱ्यावर नॅचरल ग्लो येतो.
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने शरीराला पाण्याचा पुरवठा होतो. मात्र, तुपात कॅलरीज जास्त असल्याने त्याचे अतिसेवन टाळावे. कोलेस्टेरॉल किंवा हृदयविकाराचा त्रास असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.