Shreya Maskar
तूप हे चरबीचा स्रोत असल्यामुळे त्यातून मोठ्या प्रमाणात कॅलरीज मिळतात. त्यात संतृप्त चरबीही असते, त्यामुळे याचे सेवन मर्यादित करावे. आपल्या एकूण आहारातील चरबी आणि कॅलरींचा विचार करून तूप मर्यादित प्रमाणात घेणं योग्य राहते.
गरम भात, डाळ, खिचडी किंवा पोळीवर तूप घातल्यास पदार्थाच्या उष्णतेमुळे तूप सहज वितळते. तूप वेगळं कढईत गरम करण्याची गरज नसते.
तूप जास्त तापवणे टाळा. तूप धूर निघेपर्यंत किंवा जळेपर्यंत गरम करणे टाळा. जास्त तूप गरम केल्यामुळे तुपाची चवही बिघडते आणि गरम पदार्थात गरम तूप आरोग्यास घातक ठरते.
तूप खाण्यासाठी ते मुद्दाम गरम करण्यापेक्षा तूप वितळलेल्या किंवा सामान्य तापमानातील स्वरूपात गरम भात, खिचडी, पोळी, डाळ किंवा भाज्यांमध्ये घालून खाऊ शकता.
तूप आधी वेगळं तापवून घेण्यापेक्षा जेवणात योग्य प्रमाणात मिसळणे ही सोपी पद्धत आहे, यामुळे काम सोपे होते आणि पोषणही चांगले मिळते.
शुद्ध, भेसळमुक्त तुपाचा आहारात समावेश करावा. चांगल्या दर्जाचे लोणी/दूध वापरून स्वच्छ पद्धतीने तयार केलेले घरगुती तूपही आरोग्यास अनेक फायदे देते.
सामान्यतः दिवसातून १–२ चमचे तूप पुरेसे ठरू शकते. हे प्रमाण कमी झाले तरी चालेल मात्र वाढले नाही पाहिजे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानं घ्यावीत.