Siddhi Hande
कोकणातील लोकप्रिय पदार्थ म्हणजे घावणे. मऊ,लुसलुशीत घावणे खूप टेस्टी लागतात.
अनकेदा घावणे लुसलुशीत होत नाही. घावणे छान मऊ होण्यासाठी ही ट्रिक वापरा.
तांदळाचे पीठ, पाणी, मीठ, तेल
किंवा तुम्ही तांदळाच्या पीठात पाणी टाका. त्यात थोड मीठ टाका. या पीठाच्या गुठल्या होऊ देऊ नका.
हे मिश्रण डोसा बॅटरपेक्षाही पातळ असावे.
यानंतर तुम्हाला नॉन स्टिक पॅन किंवा बिडाचा तवा घ्यायचा आहे. त्यावर तेल लावून पुसून घ्या.
यानंतर तव्याच्या कड्यापासून मिश्रण टाका. मिश्रण जास्त वरुन टाका. जेणेकरुन जाळी चांगली येईल,
घावणावर १ मिनिटासाठी झाकण ठेवा. कडा सुटू लागल्या की ते अलगद उलून घ्या.
दुसऱ्या बाजूने चांगलं भाजल्यावर तुम्ही घावण काढू शकतात. हे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता.