Manasvi Choudhary
गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी उकडीचे मोदक घरीच बनवा. उकडीचे मोदक बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
अत्यंत कमी वेळात तुम्ही पारंपारिक पद्धतीचे उकडीचे मोदक घरी बनवू शकता.
उकडीचे मोदक बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, पाणी, तूप, दूध, मीठ, नारळ, गूळ, खसखस, वेलची पावडर, जायफळ आणि तूप हे साहित्य घ्या.
उकडीचे मोदक बनवताना सर्वातआधी गॅसवर कढईत तूप गरम करा आणि त्यात खसखस भाजून घ्या. नंतर या मिश्रणात खवलेला नारळाचा किस आणि गूळ परतून घ्या.
गूळ मिश्रणात वितळल्यानंतर त्यात वेलची आणि जायफळ पावडर मिक्स करा. मिश्रण जास्त कोरडे होणार नाही याची काळजी घ्या.
गॅसवर एका पातेल्यात पाणी उकळून घ्या त्यात मीठ, तूप आणि दूध मिक्स करा. पाण्याला उकळ आली की त्यात तांदळाचे पीठ मिक्स करा आणि ढवळून घ्या.
उकड तयार झाली की परातीमध्ये काढा नंतर हाताला थंड पाणी लावून पीठ चांगले मळून घ्या. पीठ मऊ करा.
पिठाचा छोटा गोळा करा आणि त्याची पारी लाटून घ्या. नंतर त्यात तयार सारण भरा आणि बोटाच्या सहाय्याने नाजूक कळ्या पाडा.
गॅसवर कुकरमध्ये चाळणीला तूप लावा किंवा त्यावर केळीचे/हळदीचे पान ठेवा मोदक त्यावर ठेवून मध्यम आचेवर १० ते १२ मिनिटे वाफवून घ्या.