ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रत्येक महिलेला तिचे डोळे सुंदर आणि अधिक आकर्षित दिसावेत असं वाटत असतं.
यासाठी बऱ्याच महिला कृत्रिम आयलॅशेस वापरतात.
पण या काही सोप्या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही नैसर्गिकरित्या घनदाट आयलॅशेस मिळवू शकता.
नारळाचे तेल आय लॅशेस घनदाट करण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.
नारळाच्या तेलात फॅटी अॅसिड आणि मुख्यतः लॉरीक अॅसिड असतं जे आय लॅशेस वाढवण्यास मदत करतात.
बदामाचे तेल देखील आय लॅशेस मजबूत बनवतात व पापण्यांचे केस गळत नाहित.
अधिक परिणामासाठी तुम्ही बदामाच्या तेलात व्हिटॅमिन इ कॅप्सूल मिसळा. रात्री झोपण्याआधी पापण्यांवर लावा.
आय लॅशेससाठी आणखी एक पर्याय म्हणजे कॅस्टर ऑईल.
कॅस्टर ऑईलमध्ये असलेले रेटिनॉल पापण्यांच्या केसांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतं.