ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या वाहतुकीचे नियम कडक झाले आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे ड्राईव्हिग लायसन्स नाही ते नवीन लायसन्स बनवत आहेत.
मात्र सध्या बाहेर कडक उन्हामुळे अनेकजण बाहेर जाण्याचा जराही विचार करत नाही.
जर तुम्हाला घरच्या घरी ड्राईव्हिग लायसन्स बनवायच आहे,तर खाली दिलेल्या माहिती आधारे ऑनलाईन ड्राईव्हिग लायसन्स काढू शकता.
पहिल्यांदा तुम्ही भारत सरकारच्या रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अधिकृत वेवसाईट ' https://parivahan.gov.in/parivahan/ या साईटवर जा.
त्या साईटवर गेल्यानंतर तुम्हाला डाव्या बाजूला असलेल्या ऑनलाईन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
मग 'सर्विसेस ऑन ड्राइविंग लाइसेंस' वर क्लिक करुन तिथे दिलेली माहिती भरावी.
दिलेल्या अर्जामध्ये माहिती भरुन संबंधित संपूर्ण कागदपत्र जोडा.
संपूर्ण अर्ज आणि कागदपत्र भरल्यानंतर संपूर्ण ऑनलाईन प्रोसेस पूर्ण होईल.
प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर काही दिवसांत ड्राईव्हिग लायसन्स तुमच्या पत्त्यावर येईल.