ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
द ग्रेटेस्ट जनरेशन,साइलेंट जनरेशन,बेबी बूमर्स जेनरेशन,जेनरेशन X,मिलेनिअल्स, जेनरेशन Z, जेनरेशन अल्फानंतर २०२५ पासून बीटा जनरेशनची सुरुवात झाली आहे.
ऑस्ट्रेलियन भविष्यवादी मार्क मॅकक्रिंडल यांनी "जनरेशन बीटा" हा शब्द 2025 आणि 2039 दरम्यान जन्मलेल्या मुलांचे वर्णन करण्यासाठी सादर केला होता.
जगात १ जानेवारी २०२५ ते २०३९ पर्यंतच्या जनरेशनला जेनरेशन बीटा म्हणून संबोधले जाईल.
भारताताल्या पहिल्या बीटा जनरेशनच्या बाळाचा जन्म १ जानेवारी २०२५ रोजी १२ वाजून ०.३ मिनिटांनी झाला.
मिझोरामच्या ऑयझॅाल येथील सिनॅाड हास्पिटल, डर्टलांग येथे रामझिरमावी आणि झेडडी रेमरुआत्सांगा यांच्या पोटी बाळाचा जन्म झाला.
भारतातला पहिल्या बीटा बाळाचे नाव फ्रॅंकी रेमरुएटदिका जेडेंग अस आहे. जन्मताच बाळाचे वजन ३.१२ किलो होते.
फ्रॅंकी हा भारताचा बीटा जनरेशनचा पहिला मुलगा आहे. तसेच तो भारताचा किड्स ऑफ बीटाचा पहिलं बाळ ठरला आहे.
जनरेशन बीटाच्या आयुष्यात ऑर्टिफिशियल इंटिलिजेंसचा अधिक प्रभाव असणार आहे. ही जनरेशन सोशल मीडीया ते नव्या यंत्रणेचा सर्रास वापर करताना दिसणार आहे.
NEXT: मकर संक्रांतीचा सण आयलाय, झटपट बनवा तिळाचे लाडू, रेसिपी एकदा बघाच!