Shruti Vilas Kadam
जेनेलिया देशमुख ही भारतीय चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
जेनेलिया देशमुखने इंस्टाग्रामवर तिचा नवीन लुक शेअर केला आहे.
जेनेलियाने २००३ मध्ये हिंदी चित्रपट तुझे मेरी कसम मधून पदार्पण केले.
तिने तमिळ आणि तेलुगू चित्रपटसृष्टीतही छाप पाडली. तेलुगूतील बोम्मरिल्लू या चित्रपटातील तिच्या भूमिकेला खूप प्रशंसा मिळाली.
हिंदीमध्ये जाने तू... या जाने ना या चित्रपटाने तिच्या कारकिर्दीला नवा उभारा मिळवून दिला.
२०१२ साली तिने अभिनेता रितेश देशमुखशी विवाह केला. त्यांच्या दोन मुलं आहेत – रियान आणि राहिल
२०२२ मध्ये मराठी चित्रपट वेड द्वारे तिने पुन्हा सिनेसृष्टीत पुनरागमन केले.