Manasvi Choudhary
सकाळी नाश्ता म्हणून भाकरी आणि भाजी खाण्याची जुनी पद्धत आहे.
अनेकांना सकाळी हलकं असं झुणका आणि भाकरी खयला आवडते.
गावरान स्टाईल झुणका घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
झुणका बनवण्यासाठी बेसन, कांदा, मसाला, शेंगदाणा, तेल, मीठ आणि कोथिंबीर हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गॅसवर कढईमध्ये गरम तेलामध्ये जीरे आणि मोहरीची फोडणी द्या.
नंतर यामध्ये कडीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घाला.
कांदा चांगला सोनेरी रंग येईपर्यत परतून घ्या. नंतर यासंपूर्ण मिश्रणात थोडे पाणी घाला.
नंतर यामध्ये लाल तिखट आणि मीठ घाला. मिश्रण योग्य रित्या उकळून घ्या.
संपू्र्ण मिश्रणात आता शेंगदाण्याचे कूट आणि बेसन पीठ घाला
यानंतर संपूर्ण मिश्रण चमच्या सहाय्याने चांगले परतून घ्या.
अशाप्रकारे झणझणीत गावरान स्टाईल झुणका रेसिपी तयार आहे.