Siddhi Hande
भेंडी खायला सर्वांना आवडत नाही. विशेषत लहान मुले भेंडीची भाजी खात नाही.
तुम्ही जर शेंगदाण्याचा कूट घालून भरली भेंडी केली तर मूले काही मिनिटांत फस्त करतील.
सर्वात आधी भेंडी स्वच्छ धुवून घ्या. ती मध्यभागी चिरुन घ्या.
यानंतर तुम्ही एका भांड्यात शेंगदाण्याचा कूट, मसाला, मिरची पावडर, धने-जिरे पूड आणि चवीनुसार मीठ मिक्स करा.
या मिश्रणात हवं तर थोडंसं तेल टाका.
यानंतर हे मिश्रण थोडं-थोडं भेंडीमध्ये भरा. भेंडी काही वेळ तशीच ठेवून द्या.
यानंतर कढईत तेल टाका. तुम्हाला हवं असेल तर जिरं, मोहरी टाकू शकतात.
या कढईत ही भेंडी टाका आणि छान परतून घ्या. या भेंडीवर तुम्हाला उरलेला शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे.
यानंतर कढईवर झाकण ठेवा. २-४ मिनिटे भेंडी तशीच शिजवून घ्या.
यानंतर भेंडी वाफेवर शिजली की तुम्ही ती खाऊ शकतात. गरमारगरम भेंडी आणि चपाती खायला तुम्हाला खूप आवडेल.