Shreya Maskar
कोकणाला लांब-समृद्ध किनारपट्टी लाभली आहे. मात्र कोकणातील काही बीच हे फार कमी लोकांना माहित आहे. त्यातील एक म्हणजे गावखडी बीच.
गावखडी बीच हा रत्नागिरी जिल्ह्यातील पावसजवळील एक अत्यंत सुंदर, शांत आणि स्वच्छ समुद्रकिनारा आहे. गावखडी बीच हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेला आहे.
गावखडी बीच गर्दीपासून दूर आहे. येथे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो. वन डे पिकनिकसाठी खास लोकेशन आहे.
गावखडी बीच वरून सूर्यास्त आणि सूर्योदयाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. निळेशार पाणी, काळी वाळू आणि सुरूच्या झाडांच्या रांगा आहेत.
गावखडी बीच जवळील प्रमुख ऐतिहासिक किल्ला म्हणजे पूर्णगड किल्ला होय. हा किल्ला गावखडीपासून मुचकुंदी नदीच्या खाडीपलीकडे, पश्चिमेला अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर स्थित आहे.
गावखडी बीच परिसरात ऐतिहासिक वृद्धेश्वर सिद्धेश्वर मंदिर आणि राम मंदिर आहे. १८ व्या शतकात सरदार घोरपडे यांनी बांधलेले हे सिद्धेश्वर मंदिर अत्यंत निसर्गरम्य असून कोकणातील एक प्रमुख धार्मिक ठिकाण आहे.
गावखडी बीचला पावसाळ्यात आणि हिवाळ्यात भेट द्या. हिवाळ्यात येथील निसर्ग छान खुलून येतो. तुम्ही येथे सुंदर फोटोशूट करू शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.