Gavaricha Thecha Recipe: घरच्या घरी बनवा गावरान चवीचा झणझणीत गवारीचा ठेचा, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

250 ग्रॅम गवारीच्या शेंगा 8 ते 10 हिरव्या मिरच्या 8 ते 10 लसूण पाकळ्या 2 टेबलस्पून शेंगदाण्याचा कूट 2 टेबलस्पून तेल चवीनुसार मीठ कोथिंबीर (सजावटीसाठी)

Gavaricha Thecha Recipe | yandex

गवारी स्वच्छ करून उकळा

गवारीच्या शेंगांचे दोरे काढून त्या स्वच्छ धुवा. नंतर थोड्या पाण्यात मऊ होईपर्यंत उकळून घ्या आणि पाणी निथळून ठेवा.

Gavaricha Thecha Recipe | saam tv

मिरची आणि लसूण भाजून घ्या

कढईत थोडे तेल गरम करून हिरव्या मिरच्या आणि लसूण हलकेसे भाजून घ्या. यामुळे ठेच्याची चव अधिक खुलते.

Gavaricha Thecha Recipe | Google

ठेचा तयार करा

खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये भाजलेल्या मिरच्या, लसूण आणि मीठ घालून जाडसर वाटून घ्या. पारंपरिक चवीसाठी खलबत्ता वापरणे अधिक योग्य ठरते.

Gavaricha Thecha Recipe | Google

गवारी मिसळा

वाटलेल्या मिश्रणात उकडलेली गवारी घालून पुन्हा जाडसर ठेचा तयार करा. गवारी पूर्णपणे बारीक न करता थोडी खरबरीत ठेवावी.

Gavaricha Thecha Recipe

शेंगदाण्याचा कूट घाला

ठेच्यात शेंगदाण्याचा कूट मिसळा. यामुळे ठेच्याला छान पोत आणि चव मिळते.

Gavaricha Thecha Recipe | Google

फोडणी देऊन सर्व्ह करा

कढईत तेल गरम करून ठेच्याला हलकी फोडणी द्या. वरून कोथिंबीर भुरभुरवा आणि गरम भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करा.

Gavaricha Thecha Recipe

Cornflakes Chivda: शाळेत सुका खाऊ देण्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत स्वादिष्ट मक्याचा चिवडा, वाचा रेसिपी

Cornflakes Chivda | Pintrest
येथे क्लिक करा