Shreya Maskar
गवळीदेव धबधबा नवी मुंबईतील घणसोली येथेच आहे. नवी मुंबईतील सुंदर पिकनिक डेस्टिनेशन आहे. येथे वीकेंड गर्दी पाहायला मिळते.
गवळीदेव धबधबा घणसोली टेकडी किंवा गवळीदेव डोंगर म्हणूनही ओळखला जातो. येथून नवी मुंबईचे सुंदर दृश्य पाहायला मिळते.
पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पर्यटकांची येथे गर्दी पाहायला मिळते. तसेच या मौसमात धबधब्याचे सौंदर्य आणखी खुलून येते.
घणसोली स्टेशन मुंबई उपनगरीय रेल्वेच्या हार्बर लाइनवर आहे. तर घणसोली स्टेशनला उतरून तुम्ही रिक्षाने गवळीदेव धबधब्याला पोहचू शकता.
गवळीदेव धबधब्याला गेल्यावर डोंगर, दऱ्या, घनदाट वनराई पाहायला मिळते. तसेच येथे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो.
घणसोली/रबाळे एमआयडीसी परिसरात गवळी देव डोंगर आहे, ज्याच्या माथ्यावर एक छोटे गवळी देव मंदिर आहे.
गवळीदेव धबधब्याखाली चिंब भिजून तुम्ही फोटोशूट करू शकता. वीकेंडला येथे फॅमिली, फ्रेंड्ससोबत पिकनिक प्लान करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.