Manasvi Choudhary
गौतमी पाटील सध्या तिच्या नव्या 'हिल पोरी हिला...' या गाण्यामुळे चांगलीच चर्चेत आहे. विशेष म्हणजे या गाण्यात गौतमीसोबत सुप्रसिद्ध अभिनेता भाऊ कदम देखील आहे.
गौतमीने दिलखेचक नृत्याने आणि अदांनी अतिशय कमी वयात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे.
नुकतंच गौतमीने साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहेत. पारंपारिक रूपातील तिचं सौंदर्य पाहून फॅन्स देखील घायाळ झाले आहेत.
मराठमोळ्या अंदाजात नाकात नथ, कपाळी टिकली, गळ्यात नेकलेस तिने घातला आहे. तिने केस मोकळे ठेवले आहेत.
गौतमीने या फोटोंना 'दिसला गं बाई दिसला' असं कॅप्शन दिलं आहे. हॉर्ट इमोजी देखील तिने शेअर केला आहे.
सोशल मीडियावर गौतमीचा फॅन्स फॉलोविंग मोठी आहे. तिचे फोटो असो किंवा व्हिडीओ चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव सुरू असतोच.