Vishal Gangurde
मुंबई शहर आता फक्त देशाची आर्थिक राजधानी नव्हे, तर अब्जाधिशांची राजधानी बनली आहे.
हुरुन इंडियाने प्रसिद्ध केलेल्या श्रीमंतांच्या यादीतून देशातील अब्जाधिशांविषयी माहिती समोर आली आहे.
मुंबईतील श्रीमंतांची संख्या ५८ ने वाढून ३८६ इतकी झाली आहे. या यादीत टॉप १० पैकी ५ अब्जाधीश हे मुंबईकर आहेत.
मुंबईतील अब्जाधिशांमध्ये एकही मराठी माणसाचा समावेश नाही. यामध्ये मुकेश अंबानी ते शाहरुख खानचा समावेश आहे.
या अब्जाधिशांमध्ये मुकेश अंबानी, दिलीप संघवी, कुमार मंगलम् बिर्ला, राधाकिशन दमानी, नीरज बजाज, आदित पालीचा या उद्योजकांचा समावेश आहे.
या यादीत शाहरुख खान, जुही चावला, अमिताभ बच्चन, करण जोहर या सिनेकलाकारांचा समावेश आहे.
मुंबईने बीजिंगलाही अब्जाधिशांच्या यादीत मागे टाकलं आहे. अदानींनी या यादीत पहिलं तर अंबानींनी दुसरं स्थान पटकावलं आहे. या श्रीमंतांच्या टॉप 10 मध्ये एकही मराठी व्यक्तीचं नाव नाही.