ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री गौरी नलावडे नेहमीच आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.
गौरी नलावडेची 'स्वप्नांच्या पलिकडले' ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस आली होती.
गौरीने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे.
गौरीने नुकतेच जांभळ्या रंगाच्या काठपदर साडीतील सुंदर फोटो पोस्ट केले आहे.
गौरीने या साडीवर पिवळ्या रंगाचा ऑफ शोल्डर ब्लाउज घातला आहे.
गौरीने या लूकवर छान लांबलचक वेणी घातली आहे. केसात बिंदी लावून सुंदर लूक केला आहे.
गौरी नलावडेने या लूकमध्ये हटके फोटोशूट केले आहे. तिच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.