Manasvi Choudhary
गौरी पूजेसाठी नैवेद्याला विशेष महत्त्व असते. माहेरवाशीन गौरीच्या नैवेद्यासाठी विविध पारंपरिक पदार्थ तयार केले जातात.
गौरी नैवेद्यासाठी कमी वेळात बनवता येणारे 5 सोपे आणि चविष्ट पदार्थ जाणून घ्या.
गौरीच्या नैवेद्यामध्ये पारंपारिक पद्धतीचे जेवण बनवले जाते. पाच वेगवेगळ्या रानभाज्यांची भाजी बनवली जाते दुधी भोपळा, पडवळ, गवार, भेंडी किंवा शेवग्याची शेंग या भाज्या घालून तुम्ही ही भाजी बनवा.
ओला नारळ आणि गुळाचे सारण भरून तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक किंवा पुरणाचे दिंडा ही रेसिपी तुम्ही करू शकता.
जेवणाच्या ताटात रंगत आणण्यासाठी आणि तोंडी लावण्यासाठी साबुदाण्याची खीर किंवा तांदळाच्या कुरडया तुम्ही निवडू शकता.
गौरी नैवेद्यात तुम्ही गोड पदार्थ म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य बनवा.