कोमल दामुद्रे
यश मिळवण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो परंतु, नेहमीच मिळते ते अपयश.
गौर गोपाल दास म्हणतात की, यशस्वी होण्यासाठी अनेकदा आपण नव्या योजना आणि कठीण परिश्रम घेणे गरजेचे आहे.
आपल्या वैयक्तिक आयुष्यात, नातेसंबंधात, नोकरीत किंवा करिअरमध्ये एकाच ठिकाणी अडकून राहायचे नाही.
जर तुम्हाला आयुष्यात पुढे जायचे असेल तर गौर गोपाल दासांनी सांगितलेल्या या ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा.
कोणतेही काम करताना लोक काय म्हणतील या गोष्टीचा विचार करु नका.
इतरांची मते किंवा सल्ला घेताना स्वत:चे मतही लक्षात घ्या. ज्यामुळे यश मिळवण्यास मदत होईल.
नशीब बदलण्याची वाट बघू नका. कठोर परिश्रम करत रहा. ज्यामुळे तुम्हाला यश नक्कीच मिळेल.
कोणतीही गोष्ट करताना नेहमी संयम बाळगा तसेच स्वत:ला वेळ द्या