ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मुंबई ही स्वप्ननगरी मानली जाते आणि त्याच स्वप्न नगरीत गेटवे ऑफ इंडिया स्थित आहे. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया बघण्याकरिता अनेक लोक लांबून येत असतात.
गेटवे ऑफ इंडियाला भारताचे प्रवेश व्दार म्हणून संबोधिले जाते. हा मुंबईतील फेमस स्मारक म्हणून ओळखले जाते.
१९११ मध्ये राजा जॉर्ज पाचवा आणि राणी मेरी यांच्या भारतात आगमनाच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आले.
१९११ मध्ये पायाभरणी झाली, परंतु फायनल डिझाइन १९१४ मध्ये पूर्ण झाले. ते जॉर्ज विटेट यांनी बांधले होते.
गेटवे ऑफ इंडियाचे बांधकाम १० वर्षांत पूर्ण झाले.
गेटवे ऑफ इंडिया बेसाल्ट दगडांपासून बनलेला आहे. त्याची उंची अंदाजे ८५ फूट आहे.
तुम्ही कधी विचार केला आहे का की गेटवे ऑफ इंडिया समुद्राकडे का तोंड करून आहे? जाणून घ्या, ही इमारत समुद्रातून शहरात येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करते, म्हणून त्याचे तोंड समुद्राकडे आहे.
मुंबईचे गेटवे ऑफ इंडिया हे मजबूत दगडांनी बांधलेले आहे. मुंबईत असंख्य वादळे आली आहेत परंतू ते हलवू शकले नाहीत. गेटवे ऑफ इंडियाला मुंबईची ढाल म्हणतात.
गेटवे ऑफ इंडियाचे सौंदर्य हे रात्रीच्या वेळेस खुलून दिसून येते .आत आणि बाहेरील दोन्ही बाजूस विविध प्रकारच्या लाईट गेटवे ऑफ इंडियावर झळकत असतात.
मुंबई फिरण्याचा प्लान तुम्ही कधीही आणि केव्हाही करु शकता. या ठिकाणी नजारा बघण्यासाठी नेहमीच लोकांची गर्दी असते.