Manasvi Choudhary
यंदा गटारी अमावस्या येत्या बुधवारी म्हणजेच १२ जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. गटारी ही आषाढ महिन्यातील अमावस्येला साजरी केली जाते.
या दिवशी कुटुंबिय, मित्र परिवारासोबत मौजमज्जा आणि चटपटीत पदार्थ्यांचा आस्वाद घेतला जातो.
या दिवशी तुम्हाला नवीन रेसिपी ट्राय करायची असल्यास तुम्ही व्हेज लॉलीपॉप ही रेसिपी ट्राय करा. अत्यंत सोपी आहे.
व्हेज लॉलीपॉप घरी बनवण्यासाठी तुम्हाला उकडलेले बटाटे, मटार, आलं- लसूण पेस्ट, हिरवी मिरची, ब्रेड क्रम्स, कॉर्नफ्लोअर, मैदा, मसाला, गरम मसाला तेल आणि मीठ हे साहित्य लागणार आहे.
एका मोठ्या बाऊलमध्ये उकडलेले मॅश केलेले बटाटे, किसलेल्या कोबी, गाजर किंवा मटार भाज्या, आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरच्या, लाल तिखट, गरम मसाला, चाट मसाला आणि चवीनुसार मीठ एकत्र करा.
मिश्रणात २ मोठे चमचे ब्रेड क्रम्स घाला, ज्यामुळे मिश्रण घट्ट होईल आणि लॉलीपॉप तळताना तेलकट होणार नाहीत किंवा तुटणार नाहीत.
हाताला थोडे तेल लावून या मिश्रणाचे छोटे गोळे बनवा आणि त्यांना लांबट किंवा चपटा असा लॉलीपॉपचा आकार द्या. आता प्रत्येक गोळ्यात एक आईस्क्रीमची काडी मध्यभागी हलक्याच हाताने तयार करा.
एका वाटीत मैदा, कॉर्नफ्लॉवर, चिमूटभर मीठ आणि थोडे पाणी मिसळून मध्यम पातळ पेस्ट तयार करा.
कढईत तेल मध्यम गरम करा. तयार केलेले लॉलीपॉप तेलात हलक्या हाताने सोडा आणि गॅस मध्यम आचेवर ठेवून ते सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत चांगले तळून घ्या