Shreya Maskar
गार्लिक पोटॅटो बनवण्यासाठी लहान आकाराचे बटाटे, लसूण, बटर, काळी मिरी पावडर, जिरे पावडर, आमचूर पावडर, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.
गार्लिक पोटॅटो बनवण्यासाठी सर्वप्रथम लहान आकाराचे बटाटे उकळून घ्या.
बटाट्याला चांगला मसाला लागण्यासाठी चारही बाजूंनी छिद्रे पाडून साल काढून घ्या.
मसाला तयार करण्यासाठी बाऊलमध्ये मीठ, काळी मिरी पावडर, आमचूर पावडर, जिरे, तिखट घालून मिक्स करून बटाट्यांना लावा.
पॅनमध्ये बटर टाकून त्यात लसूण परतून मसाल्यांनी कोट केलेले बटाटे घाला.
बटाटे गोल्डन फ्राय झाले की त्यात ओरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाका.
शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीरने गार्निश करा.
टेस्टी गार्लिक पोटॅटोंचा पुदिन्याची चटणीसोबत आस्वाद घ्या.