Manasvi Choudhary
लसूण आरोग्यासाठी अत्ंयत प्रभावी मानला जातो. आयुर्वेदा लसूण त्याच्या औषधी गुणधर्मासाठी ओळखला जातो.
आहारात देखील लसणाचा वापर केला जातो. लसूण जेवणाची चव वाढवते.
आज आम्ही तुम्हाला चटपटीत लसणाचा लोणचा कसा बनवायचा ही रेसिपी सांगणार आहोत.
लसणाचा लोणचे बनवण्यासाठी लसूण, मोहरीचे तेल, मेथी दाणे, मोहरी, बडीशेप, लाल मिरची, कढीपत्ता, मीठ, हळद, मसाला हे साहित्य एकत्र करा.
लसूण लोणचे बनवण्यासाठी सर्वप्रथम गॅसवर कढईमध्ये तेल गरम करा.
तेलाला कड आली की त्यामध्ये मोहरी, मेथी दाणे, कढीपत्ता, लाल मिरची घाला.
संपूर्ण मिश्रणात लसूण घालून मिश्रण चांगले परतून घ्या. नंतर या मिश्रणात मीठ, हळद, लाल मसाला घालून चांगले एकजीव करा.
अशाप्रकारे लसूण लोणचे एका हवाबंद डब्यात भरून ठेवा.