Shreya Maskar
लसूण चटणी बनवण्यासाठी लसूण पाकळ्या, हिरवी मिरची, कोथिंबीर, लिंबाचा रस, गरजेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ इत्यादी साहित्य लागते.
लसूण चटणी बनवण्यासाठी सर्वप्रथम लसूण पाकळ्या सोलून बारीक करून घ्या.
त्यानंतर हिरव्या मिरच्या बारीक करा.
आता मिक्सरला लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर, थोडा लिंबाचा रस टाकून पेस्ट बनवा.
मिक्सरमध्ये गरजेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ घालून थोडी घट्टसर चटणी वाटून घ्या.
लसूण चटणीची चव अजून वाढायची असल्यास त्यात थोडा गूळ देखील घाला.
दीर्घकाळ चटणी टिकवण्यासाठी त्यात तुम्ही वरून तेल घालू शकता.