Siddhi Hande
रोज नाश्त्याला काय बनवावं असा प्रश्न असतो. नाश्त्याला काहीतरी चटपटीत खायला सर्वांनाच आवडते.
तुम्ही नाश्त्याला चटपटीत गार्लिक ब्रेड बनवू शकतात. गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी रेसिपी खूप सोपी आहे.
ब्रेड, बटर, चीली फ्लेक्स, ऑरेगॅनो, चीज, लसूण, मिरची
सर्वात आधी तुम्हाला लसणाच्या पाकळ्या सोलून घ्यायच्या आहे. यानंतर हा लसूण बारीक चिरुन घ्या.
लसूण चिरण्याऐवजी तुम्ही तो कुटून बारीक करु शकतात. त्यात २ मिरचीदेखील टाका.
यानंतर एका वाटीत बटर गरम करायला ठेवा. त्यात हे लसणाचे बारीक तुकडे टाका. छान थोडे लालसर होईपर्यंत ते हलवून घ्या.
यानंतर गॅस बंद करा. त्यात चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो आणि कोथिंबीर टाकून मिक्स करा.
यानंतर तुम्ही ब्रेडवर हे गार्लिकचे मिश्रण छान स्प्रेड करुन घ्या. त्यावर चीज किसून टाका.
एका बाजूला तवा गरम करा. त्यावर बटर लावून हे ब्रेड त्यावर ठेवा.
यानंतर वरुन झाकण ठेवा. यानंतर लगेच ५ मिनिटांत गॅस बंद करा. तुम्ही हे गार्लिक ब्रेड खाऊ शकतात.