Manasvi Choudhary
येत्या गणेश चतुर्थीला लाडक्या गणरायाचे घरोघरी आगमन होणार आहे. गणरायाच्या आगमनाने घरात सकारात्मकता येते.
गणरायाला घरी आणल्यानंतर तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे. गणपतीची स्थापना करण्यासाठी तुम्ही योग्य दिशा कोणती हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.
वास्तुशास्त्रानुसार, गणरायाची स्थापना केवळ विधी नसून सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते. गणरायाची स्थापना करण्यासाठी ईशान्य दिशा ही सर्वात शुभ मानली जाते. वास्तुशास्त्रानुसार, हि लक्ष्मी आणि कुबेर यांची दिशा मानली जाते.
ईशान्य या दिशेला बाप्पाची स्थापना केल्याने घरात सुख, शांती आणि अखंड समृद्धी नांदते. जर ईशान्य दिशा शक्य नसेल, तर पूर्व किंवा उत्तर दिशेलाही मूर्ती स्थापन करू शकता.
गणपतीची मूर्ती मखरात ठेवताना बाप्पाचे मुख उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला राहील असे पाहा. दक्षिण दिशेला बाप्पाचे तोंड कधीही असू नये, याची विशेष काळजी घ्या.
गणपतीची मूर्ती ज्या भिंतीवर किंवा पाटावर स्थापित करत आहात, ती भिंत घराच्या कोणत्याही टॉयलेट किंवा बाथरुमच्या भिंतीला लागून नसावी.
गणपतीची मूर्ती कधीही थेट जमिनीवर ठेवू नये. बाप्पासाठी मखरात योग्य जागा तयार करून त्यावर चौरंग ठेवावा. पाटावर सुंदर लाल रंगाचे वस्त्र अंथरून त्यावर अक्षता वाहून मगच गणपतीची स्थापना करावी.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.