Manasvi Choudhary
अवघ्या काही दिवसांवर आपल्या लाडक्या बाप्पाचा गणेशोत्सव हा पवित्र सण आला आहे. यंदा १४ सप्टेंबर २०२६ रोजी लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन होणार आहे.
बाप्पाच्या स्वागतासाठी घराची स्वच्छता, रंगरंगोटी आणि जय्यत तयारी सुरू आहे. पण वास्तुशास्त्रानुसार, बाप्पाचे आगमन होण्यापूर्वी घरात साचलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर काढणे अत्यंत गरजेचे असते.
वास्तुशास्त्रानुसार, गणपती बाप्पाच्या स्थापनेपूर्वी घराची स्वच्छता करताना ५ अशुभ वस्तू बाहेर काढाव्यात. त्या वस्तू कोणत्या? ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
देवघरात किंवा घरात कुठेही तुटलेली, तडे गेलेली देवाची मूर्ती ठेवणे अशुभ मानले जाते. अशा मूर्ती विसर्जन कराव्यात किंवा वाहत्या पाण्यात सोडाव्यात.
घरात बंद पडलेली घड्याळे नकारात्मक ऊर्जा आणि आर्थिक अडथळे आकर्षित करतात. बाप्पाच्या आगमनापूर्वी घरातीलबंद घड्याळे दुरुस्त करून घ्या किंवा फेकून द्या.
कपाटात पडून असलेले जुने, फाटलेले किंवा लहान झालेले कपडे घरातून काढून टाका.
घरात तडे गेलेले ग्लास, ताट किंवा आरसा ठेवणे वास्तूनुसार अत्यंत वाईट मानले जाते.
बाल्कनी किंवा हॉलमध्ये ठेवलेली वाळलेली झाडे असतील तर ती काढून टाका.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.