DJ Noise Health Risks: गणपतीत डीजेच्या आवाजापासून स्वतःला कसे सुरक्षित ठेवाल? 5 टिप्स वाचा

Manasvi Choudhary

लाडक्या गणरायाचे आगमन

अवघ्या काही दिवसांमध्ये घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी आपल्या लाडक्या गणरायाचे मोठ्या उत्साहात आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमनाची जय्यत तयारी सुरू असून, ढोल-ताशांच्या गजरासोबतच सर्वत्र डिजेचा दणदणाट पाहायला मिळतो.

DJ Noise Health Risks

डिजेच्या आवाजामुळे होतात गंभीर परिणाम

उत्सव आनंदात साजरा करणे योग्य असले, तरी डीजेच्या अति-उच्च आवाजामुळे शरीरावर आणि आरोग्यावर मोठे परिणाम होऊ शकतात.

DJ Noise Health Risks

डीजेच्या उच्च आवाजामुळे आरोग्यावर होणारे परिणाम

डीजेच्या मोठ्या आवाजामुळे केवळ कानाच्या पडद्यांवर ताण येतो असे नाही, तर कायमस्वरूपी बहिरेपणा येण्याचा धोका वाढतो.

DJ Noise Health Risks

हृदयाचे ठोके वाढणे

उच्च डेसिबल आवाजामुळे शरीरात अचानक ताण निर्माण होऊन हृदयाचे ठोके वेगाने वाढू शकतात, ज्यामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका (Heart Attack) येण्याचा धोका बळावतो.

Increased Heart Rate

रक्तदाब आणि मेंदूवर ताण

आवाजाच्या धक्क्याने रक्तादाब अचानक वाढतो, ज्यामुळे धमन्यांवर ताण येतो आणि गंभीर स्वरूपात मेंदूत रक्तस्त्राव होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते.

What is a Brain Stroke? | pinterest

डीजेच्या आवाजापासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?

सार्वजनिक मिरवणुकीत किंवा गणपती विसर्जनाच्या वेळी डिजेच्या स्पीकर्सपासून शक्य तितके दूर उभे राहा.

Safety Tips

कॉर्ड्स किंवा कापसाचे बोळे कानात घाला

जर तुम्ही जास्त वेळ अशा परिसरात थांबणार असाल, तर कानात कॉर्ड्स किंवा कापसाचे बोळे घालून ठेवा, जेणेकरून आवाजाची तीव्रता कानांपर्यंत पोहोचणार नाही.

| Saam TV

या लोकांनी घ्या अधिक काळजी

लहान बाळे, वृद्ध व्यक्ती आणि हृदय किंवा उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांना डिजेच्या दणदणाटापासून पूर्णपणे दूर ठेवा.

DJ Noise Health Risks

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Yandex

NEXT: Nauvari Saree Designs: गणेशोत्सवासाठी अस्सल मराठमोळा लूक; नऊवारी साडीच्या या 5 डिझाईन्स सौंदर्य वाढवतील

Nauvari Saree Designs
येथे क्लिक करा..