Shreya Maskar
यावर्षी लाडक्या बाप्पाला दाखवा बिस्किटांचे मोदक, सिंपल रेसिपी जाणून घ्या.
बिस्किट मोदक तयार करण्यासाठी बिस्किटे, बटर, दूध, ड्रायफ्रुट्स, वेलची पावडर, जायफळ कोकोनट पावडर इत्यादी साहित्य लागते.
बिस्किटांचे मोदक करण्यासाठी सर्वप्रथम बिस्किटांचा चुरा करून ते मिक्सरला वाटून घ्या.
तुमच्या आवडीनुसार तुम्ही मैदा किंवा गव्हाची बिस्कीटे वापरू शकता.
एका पॅनमध्ये तूप घाला. तूप छान वितळल्यावर त्यात बिस्किटांची पावडर टाका आणि छान मिक्स करा.
आता या मिश्रणात थंडगार दूध टाकून छान फेटून घ्या.
या मिश्रणात कोकोनट पावडर, वेलची पावडर टाकून एकत्र करून घ्या.
आता गॅस बंद करून यात वेलची पावडर टाका.
सारण थोडे कोमट असताना ते मोदकाच्या भांड्यात भरून सुंदर आकाराचे मोदक तयार करून घ्या.
तुम्ही या मोदकांमध्ये तुमचे आवडते ड्रायफ्रुट्स टाकू शकता.