Konkan Temples : कोकणात लपली आहेत गणपतीची ५ प्रसिद्ध मंदिरे, पाऊल ठेवताच मन होईल प्रसन्न

Shreya Maskar

गणेश चतुर्थी

उद्या (१४ सप्टेंबर २०२६) ला गणेश चतुर्थी साजरी केली जाणार आहे. गणपतीची भाविक वर्षभर वाट पाहतात. ११ दिवस गणेशाची मनोभावे पूजा-आरती करतात.

Ganesh Chaturthi | pinterest

कोकण वारी

गणपती म्हटलं की आपोआप पाय कोकणाची वाट पाहतात. कोकणात गणपती हा सण उत्साहाने साजरा करतात. कोकणात अनेक गणपती मंदिरे आहेत, जेथे तुम्ही आवर्जून जा.

Konkan Vari | pinterest

गणपतीपुळे मंदिर

गणपतीपुळे मंदिर हे कोकणातील समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे. गणपतीपुळे हे ४०० वर्षे जुने स्वयंभू मंदिर आहे. हे इच्छापूर्ती गणपती मंदिर आहे.

Ganapatipule Temple | pinterest

दशभुजा गणपती मंदिर

दशभुजा गणपती मंदिरात भगवान गणेशाची 'दशभुजा' (दहा हात असलेली) मूर्ती आहे. कोकणात गेल्यावर भाविक या ठिकाणी आवर्जून जातात.

Dashabhuja Ganapati Temple | pinterest

कड्यावरचा गणपती

दापोली तालुक्यातील आंजर्ले गावातील 'कड्यावरचा गणपती' हे एक अत्यंत प्रसिद्ध आणि जागृत देवस्थान आहे. हे मंदिर एका उंच टेकडीवर वसलेले आहे. हे मंदिर उजव्या सोंडेच्या दुर्मिळ गणपतीच्या मूर्तीसाठी ओळखले जाते.

Kadyavarcha Ganapati | pinterest

रेडी गणपती मंदिर

रेडी गणपती मंदिर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील रेडी या किनारी गावात स्थित आहे. येथे गणेशोत्सवाला पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते.

Redi Ganapati Temple | pinterest

सुवर्ण गणेश मंदिर

श्री सुवर्ण गणेश मंदिर हे रायगड जिल्ह्यातील दिवेआगर या किनारी भागात वसलेले एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. येथे मंगलमय वातावरण पाहायला मिळते. पावसाळ्यात येथील सौंदर्य आणखी खुलते.

Golden Ganesha Temple | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : मॉन्सूनमध्ये नेरुळची सफर ठरेल अविस्मरणीय, वीकेंडला फिरायला 'ही' ५ ठिकाणं आहेत एकदम खास!

Nerul Tourism | AI PHOTO
येथे क्लिक करा...