Shreya Maskar
गणेश चतुर्थीला गणपतीला नैवेद्य म्हणून पोह्याचे मोदक बनवा.
पोह्याचे मोदक बनवण्यासाठी पोहे, गूळ, सुके खोबरे, वेलची पावडर, बदाम आणि तूप इत्यादी साहित्य लागते.
पोह्याचे मोदक बनवण्यासाठी पोहे स्वच्छ धुवून हलके भाजून घ्या.
एका पॅनमध्ये तूप गरम करून त्या गूळ वितळवून घ्या.
गुळाच्या मिश्रणात किसलेले खोबरे, वेलची पावडर आणि ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करा.
मिश्रणात भाजलेले पोहे घालून मिश्रण घट्ट होईपर्यंत परता.
शेवटी कोमट पाण्याच्या हाताने मोदक वळून घ्या.
तुम्हाला मोदकाचा आकार बनवता येत नसेल तर मोदकाच्या मोल्डमध्ये मिश्रण टाका.