Shreya Maskar
संध्याकाळच्या नाश्त्याला चटपटीत चीजी मसाला पाव बनवा.
चीजी मसाला पाव बनवण्यासाठी पाव, चीज, बटर, कांदा, टोमॅटो, आलं-लसूण पेस्ट, पाव भाजी मसाला, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर इत्यादी साहित्य लागते.
चीजी मसाला पाव बनवण्यासाठी सर्वप्रथम पॅनमध्ये बटर टाकून त्यात कांदा, टोमॅटो आणि आलं-लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्या.
मिश्रणात पाव भाजी मसाला, लाल तिखट आणि मीठ घालून मिक्स करा.
पावला बटर लावून त्यांचे दोन भाग करा.
पावामध्ये तयार मसाला भरून बटरमध्ये हलका फ्राय करा.
पावावर भरभरून चीज घालून वितळू द्या.
शेवटी चीजी मसाला पावावर हिरवीगार कोथिंबीर भुरभुरवा.