Sakshi Sunil Jadhav
गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशीच मूर्ती आणली पाहिजे असा कोणताच नियम नाही. उत्सवाच्या ८-१० दिवस आधीही मूर्ती घरी आणू शकतो.
स्थापनेसाठी खास मुहूर्त नसतो. भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी सकाळपासून दुपारी १.३० वाजेपर्यंत कधीही पूजन करता येते.
गणेश चतुर्थी दिवशी स्थापना झाली नाही तर नंतर करू नये. एखाद्या वर्षी गणेशोत्सव लोप झालेला चालतो.
उजव्या सोंडेचा गणपती कठोर आणि डाव्या सोंडेचा सौम्य असा समज चुकीचा आहे.
गर्भवती स्त्री घरात असल्यास विसर्जन न करण्याची परंपरा चुकीची आहे. विसर्जन करता येते.
मूर्तीची उत्तरपूजा करून देव्हाऱ्यातून खाली काढली जाते व पाण्यात विसर्जन केली जाते. वाहत्या पाण्यातच विसर्जन करावे असे नाही.
विसर्जनानंतर मूर्ती विरघळावी लागते म्हणून शाडू किंवा मातीची मूर्ती असणे आवश्यक आहे.
विसर्जन कोणत्याही वार किंवा नक्षत्रात करता येते. घरगुती मूर्ती एक वीतभर उंच, आसनस्थ व सर्वांगसुंदर असावी. मूर्ती भंगली तर तातडीने विसर्जन करावे.