Manasvi Choudhary
हिवाळ्यात गरमा गरम गाजरचा हलवा खाण्याची मज्जा काहीशी वेगळीच असते.
गाजरचा हलवा खायला लहानांपासून ते मोठ्या पर्यत सर्वानाच आवडते. गाजर हलवा घरच्या घरी बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.
गाजर हलवा बनवण्यासाठी गाजर, तूप, साखरस बदाम, पिस्ता, मनुका, क्रिम मिल्क हे साहित्य घ्या.
सर्वप्रथम गाजर स्वच्छ धुवन ते किसून घ्या. ड्रायफ्रुट्सचे बारीक तुकडे करा.
गॅसवर पॅनमध्ये साजूक तूपामध्ये बारीक केले ड्रायफ्रुट्स परतून घ्या.
आता या मिश्रणात फुल क्रिम दूध घालून १५ मिनिटे मध्यम आचेवर शिजवून घ्या.
दूध आटून घट्ट झाल्यावर त्यात साखर घाला आणि मिश्रण घट्ट होईपर्यत शिजला.
मिश्रणात वरतून साजूक तूप आणि ड्रायफ्रुट्स मिक्स करा. अशाप्रकारे सर्व्हसाठी गरमा गरम गाजर हलवा तयार आहे.