Kolhapur Fort : धुक्यात हरवलेला ऐतिहासिक किल्ला, कोल्हापूरमधील 'हे' ठिकाण इतिहासप्रेमींनी पाहायलाच पाहिजे

Shreya Maskar

कोल्हापूर

गगनगड किल्ला हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्यात गगनबावडा (ज्याला 'बावडा' असेही म्हणतात) जवळ वसलेला आहे. पश्चिम घाटात २,११० फूट उंचीवर वसलेला हा किल्ला कोल्हापूर शहरापासून पश्चिमेकडे साधारण ५५ किमी अंतरावर आहे.

Kolhapur | google

गगनगड किल्ला

११९० मध्ये राजा भोज (दुसरे) यांनी बांधलेला गगनगड किल्ला 'गगनगिरी महाराज मठ' आणि आसपासच्या दाट वर्षावनांसाठी प्रसिद्ध आहे.

Gagangad Fort | google

किल्ल्याची उंची

'गगनगड' किल्ला २,११० फूट उंचीवर असलेला एक ऐतिहासिक डोंगरावरील किल्ला आहे. इतिहासप्रेमींनी या ठिकाणाला नक्की भेट द्या.

Fort Altitude | google

पावसाळी ट्रेकिंग

'गगनगड' किल्ला पावसाळ्यात ट्रेकिंगसाठी बेस्ट ऑप्शन आहे. पावसाच्या पाण्याने येथील निसर्ग बहरून येतो. आयुष्यात एकदा तरी या ठिकाणाला भेट द्या.

Monsoon Trekking | google

छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराजांनी १६५८ मध्ये विजापूरच्या सल्तनतीकडून गगनगड किल्ला जिंकून घेतला आणि त्यानंतर त्याची तटबंदी दुरुस्त करून ती अधिक मजबूत केली. हा किल्ला दख्खनचे पठार आणि कोकण किनारपट्टी यांच्यातील महत्त्वाच्या व्यापारी मार्गांचे रक्षण करण्याच्या दृष्टीने अत्यंत मोक्याची भूमिका बजावत होता.

Chhatrapati Shivaji Maharaj | google

कसं जाल?

कोल्हापूर रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही पुढे रिक्षा किंवा बसने गगनगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहचला. कोल्हापूर ते गगनबावडा हे अंतर ५५ किमी आहे.

How to Reach? | google

कोल्हापूर पर्यटन स्थळे

कोल्हापूरला गेल्यावर महालक्ष्मी (अंबाबाई) मंदिर, रंकाळा तलाव, राधानगरी (दाजीपूर) वन्यजीव अभयारण्य आणि पन्हाळा किल्ला यांना नक्की भेट द्या.

Tourist Attractions in Kolhapur | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | google

NEXT : चित्रकूट नावाने ओळखला जायचा 'हा' प्रसिद्ध किल्ला, सुंदर ऐतिहासिक ठिकाण पाहायला परदेशी पर्यटकांची गर्दी

Fort | pinterest
येथे क्लिक करा...