Gaganbawda Tourism: कोल्हापूरपासून अगदी हाकेच्या अंतरावर वसलंय 'हे' ठिकाण, या विकेंडला नक्की भेट द्या

Surabhi Jayashree Jagdish

गगनबावडा

गगनबावडा हे कोल्हापूर जिल्ह्यातील एक निसर्गरम्य ठिकाण आहे

महाराष्ट्रातील चेरापुंजी

याला "महाराष्ट्रातील चेरापुंजी" असंही म्हटलं जातं कारण याठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो.

करूळ घाट

गगनबावडा हे करूळ घाट आणि भुईबावडा घाट यांच्या तोंडाशी वसलेले आहे. हे दोन्ही घाट कोकणात जाण्याचे प्रमुख मार्ग आहेत.

गगनगड किल्ला

करूळ घाटाच्या तोंडाशीच गगनगड किल्ला आहे. पावसाळ्यात याठिकाणी फिरण्याची मजा वेगळीच आहे.

गगनगिरी महाराजांचा मठ

गगनगड किल्ल्यावर गहिनीनाथ म्हणून ओळखले जाणारे गगनगिरी महाराजांचे मंदिर आहे. हा किल्ला ऐतिहासिक आणि आध्यात्मिक दोन्ही दृष्ट्या महत्त्वाचा आहे.

पांडवलेणी

गगनबावडा रोडवर पळसंबे या ठिकाणी पांडवलेणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनोख्या गुहा मंदिरे आणि रचना आहेत.

बावडेकर वाडा

हा वाडा ऐतिहासिक महत्त्व असलेला असून, याठिकाणी एक छोटं वारसा संग्रहालय आणि पंत अमात्य घराण्याच्या प्राचीन वस्तू आहेत.

Marathi History: 'पेशव्यांची पेशवाई खाण्यात गेली' असं का म्हटलं जातं?

येथे क्लिक करा