Full Sleeves Blouse Design : फुल स्लीव्ह ब्लाउजच्या ट्रेंडी डिझाइन्स, दिसाल एकदम स्टायलिश अन् सुंदर

Shreya Maskar

ब्लाउज डिझाइन्स

आजकाल फुल स्लीव्ह ब्लाउजचा ट्रेंड पाहायला मिळत आहे. फुल स्लीव्ह ब्लाउजवर साडीचे सौंदर्य खुलते आणि तुम्ही खूपच सुंदर दिसता. तसेच यात वेगवेगळे प्रकार आणि डिझाइन्स पाहायला मिळतात.

Full Sleeves Blouse Design | pinterest

फुल स्लीव्ह ब्लाउज

तुम्हाला ऑनलाइन आणि बाजारात सहज लांब बाह्यांच्या ब्लाउज खरेदी करता येतील. ऑनलाइन तुम्हाला ब्लाउजच्या जास्त व्हारायटी पाहायला मिळतील. तर तुम्ही दादर मार्केट,कुलाबा मार्केट यांसारख्या मुंबईतील मार्केटमध्ये शॉपिंग करा.

Full Sleeves Blouse Design | pinterest

फॅशनेबल स्टाइल

फुल स्लीव्ह ब्लाउजचे अनेक प्रकार आहेत, ज्यात पफ स्लीव्ह, बेल स्लीव्ह , कोल्ड शोल्डर, केप स्लीव्ह, आणि फुल स्लीव्ह यांसारख्या स्टाईलचा समावेश होतो.

Full Sleeves Blouse Design | pinterest

नक्षीकाम

फुल स्लीव्ह ब्लाउजसाठी अनेक सुंदर नक्षीकाम पाहायला मिळते. उदा स्टोनवर्क, मोतीवर्क, थ्रेडवर्क , जरदोजी, कटवर्क हे सर्व डिझाइन्स स्टायलिश दिसतात.

Full Sleeves Blouse Design | pinterest

ब्लाउजचे प्रकार

नेट, वेलवेट, सिल्क आणि कॉटनच्या लांब बाह्यांच्या ब्लाउजवर नक्षीकाम उठून दिसते. ज्यात बाहीच्या टोकावर आणि संपूर्ण बाहीवर सुंदर डिझाइन्स करता येतात.

Full Sleeves Blouse Design | pinterest

वेस्टन लूक

फुल स्लीव्ह ब्लाउजसोबत वेस्टर्न लूक मिळवण्यासाठी तुम्ही इंडो-वेस्टर्न स्टाईलचा वापर करू शकता. ज्यात तुम्ही लांब बाह्यांचा ब्लाउज जीन्स, स्कर्ट किंवा पलाझोसोबत घालू शकता.

Full Sleeves Blouse Design | pinterest

फुल स्लीव्ह ब्लाउजचे रंग

फुल स्लीव्ह ब्लाउजमध्ये लाल, गुलाबी, निळा, पांढरा, हिरवा, पिवळा, काळा, मरून, गोल्डन, सोनेरी हे रंग खुलून दिसतात. साडीच्या रंगसंगतीनुसार ब्लाउजचा रंग निवडा.

Full Sleeves Blouse Design | pinterest

वैशिष्ट्ये

फुल स्लीव्ह ब्लाउज अधिक स्टायलिश, आकर्षक, फॅशनेबल दिसतात. तसेच थंडीत उबदार ठेवतात आणि अधिक कव्हरेज देतात.

Full Sleeves Blouse Design | pinterest

NEXT : नवीन वर्षात टेन्शन फ्री जगण्याचा मंत्र, फॉलो करा 'हे' ५ सिंपल नियम

Mental Health | yandex
येथे क्लिक करा...